आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी प्रतिनिधी : उस्मानाबाद येथील श्री. श्री.रविशंकर उच्च माध्यमिक स्कूल ची विद्यार्थिनी व उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील श्रुती सुनील माळी हिने नीटच्या परीक्षेत 720 पैकी 525 कोण प्राप्त करून उज्वल यश संपादन केल्याबद्दल बार्शी तालुका सावता परिषदेच्या वतीने श्रुती माळी यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नीट च्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल श्रुती माळी हिचा सावता परिषदेच्या वतीने सत्कार
यावेळी सावता परिषदेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी, पत्रकार आसिफ मुलाणी,सुनील माळी, शशिकांत माळी आदी उपस्थित होते.