आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
नीटच्या परीक्षेत श्रुती माळी हिचे घवघवीत यश
कारी : उस्मानाबाद येथिल श्री श्री रविशंकर उच्च माध्यमिक स्कूल ची विद्यार्थ्यांथिनी व उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील श्रुती सुनील माळी हिने नीटच्या परीक्षेत 720 पैकी 525 गुण प्राप्त करून उज्वल यश संपादित केले आहे. श्रुती माळी हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण याच महाविद्यालयात झाले असून तिचे वडील सुनील माळी व आई सुमन माळी श्री श्री रविशंकर उच्च माध्यमिक शाळेत ज्ञान दानाचे कार्य करीत आहेत, सुनील माळी यांना दोन्ही मुलीच आहेत.