कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
प्रगती फाऊंङेशन व ग्रामपंचायत सिरसाव तालुका परांङा यांच्या संयुक्त विद्यमानाने गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी व सामाजिक विविध कार्यक्रम प्रगती फाऊंङेशनने आज सुरूवात केली आहे. गावामध्ये रंगकाम, गाव उत्सव, आरोग्य शिबीरे, शैक्षणिक जनजागृती, वृक्षारोपण, आहार वाटप आदी कार्य फाउंडेशन करणार आहे. यावेळी हनुमंत चोबे, गणेश चोबे, विशाल पाटील, बालाजी पाटील, दिपक चोबे, डॉ. संदीप पाटील, जी एम दिवटे आदी उपस्थित होते.