कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल वसंत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सध्या कोरोनाचा काळ असल्याने सामाजिक बांधिलकी जपत जाधव यांनी गावातील गरजू व भूमिहीन नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले. गावातील कारी – सोनेगाव या रोडच्या कडेला झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. गावांमध्ये स्वच्छता करणारा ग्रामपंचायत कर्मचारी सचिन कदम याला नवीन कपडे देऊन त्याचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा, वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, अन्नधान्य व फळांचे वाटप
पांगरी येथील कोरोना सेंटर या ठिकाणी रुग्णांना फळांचे वाटप करून जाधव यांनी सामाजिक उपक्रम हाती घेऊन एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. अमोल जाधव यांनी सामाजिक उपक्रम राबवून केलेल्या या वाढदिवसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, ग्रामविकास अधिकारी ए. एच सोनटक्के, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी, विजयसिंह विधाते, डॉ. विलास लाडे, कुतूहल न्यूजचे संपादक इर्शाद शेख, ग्रामपंचायत सदस्य अतुल चालखोर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत काळे, मुरलीधर खरटमल, अनिल कदम, सतीश सारंग, शशिकांत माळी, ए. एम . जोशी, मोहन माने, अविनाश कांदे, संतोष जगदाळे, महेश येडवे, मयूर कावळे, परीक्षित हाजगुडे, रवींद्र आटपळकर, दीपक डोके, महेश करळे, अमोल लोहार, राहुल पखाले, महेश डोके, नितीन कात्रे, विनायक ढेंबरे आदी उपस्थित होते.