कुतूहल न्यूज नेटवर्क
पिंपरी : सोशल मीडियावर घातक शस्त्रांचं प्रदर्शन केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. गुंडा विरोधी पथकानं तरुणाची उचलबांगडी करत त्याला ढसाढसा रडवलं आहे. ‘पुन्हा अशी चूक करणार नाही’ अशी माफी मागितल्यानंतर पोलिसांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. सोशल मीडियात घातक शस्त्रांचं प्रदर्शन करून सामाजिक शांतता भंग करण्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोयता घेऊन फेसबुकवर हवा करणाऱ्या डॉनला पोलिसांनी ढसाढसा रडवलं
स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड (वय-23) असं या सोशल मीडिया डॉनचं नाव असून तो उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी गायकवाडनं सोशल मीडियावर हवा करण्यासाठी हातात कोयता घेतलेला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोसोबत त्यानं दशहत पसरवणारा मजकुर देखील पोस्ट केला. काही दिवसांनंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सायबर विभाग आणि गुंडा विरोधी पथकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे या तरुणाची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांची उचलबांगडी केली आहे.