कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर आज सकाळी 40 नवे कोरोना बाधित ; एकूण संख्या 1080
सोलापूर : जिल्हा प्रशासनाने 3 जून रोजी दिलेल्या माहिती नुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात 40 ने वाढ झाली आहे.त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तब्बल 1080 पर्यंत पोहचली आहे.एकूण 447 व्यक्तींनी या आजारावर मात केली आहे. आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 36 पुरुष तर चार महिलांचा समावेश होतो आज सकाळी आठ वाजता दिलेल्या अहवालानुसार 156 जणांचे अहवाल तपासण्यात आले यापैकी 116 निगेटिव्ह आहेत तर 40 पॉझिटिव्ह आहेत. आजपर्यंत एकूण नव्वद जणांचा बळी या कोरोना मुळे झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आज सकाळी दिली.
सोलापूर आजचा अहवाल
दि.3/06/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 156
पॉझिटिव्ह- 40 (पु. 36 * स्त्रि-4 )
निगेटिव्ह- 116
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 1080
एकुण निगेटिव्ह – 6780
एकुण चाचणी- 7860
एकुण मृत्यू- 90
एकुण बरे रूग्ण- 447