कुतूहल न्यूज नेटवर्क
कोथरूड येथून दोन वर्षांपूर्वी चोरी गेलेली कार सोलापूर पोलीसांनी पकडली
सोलापूर: कोथरूड येथून ८ जानेवारी २०१८ रोजी स्वीफ्ट कार (swift car) चोरी गेली बाबत मूळ मालकाने कोथरूड पोलीस स्टेशनात फिर्याद दिली होती व तीच दोन वर्षांपूर्वी चोरी गेलेली कार सोलापूर पोलीसांनी पकडली.
अधिक माहिती अशी की, दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक सोलापुर ते हैद्राबाद रोडवर पेट्रोलींग करीत असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात एका स्वीफ्ट कारचा नंबर संशयास्पद वाटल्याने कार चालक सागर उर्फ अभिजीत धानप्पा सोलापूर (रा.तांदूळवाडी,ता.दक्षिण सोलापूर) याच्याकडे चौकशी करता त्याने सदर कारचे कागदपत्र नसल्याचे सांगितले. तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास कारसह ताब्यात घेण्यात आले.
त्याचेकडे मिळून आलेल्या कारबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून अधिक चौकशी करता सदरची कार ही कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दिनांक ७ जानेवारी २०१८ रोजी सायं ६ वा. मूळ मालकाने त्यांच्या राहते बिल्डींग समोर रोडवर उभा करून घरात गेले होते. ते दिनांक 0८ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ०६.०० वा च्या सुमारास त्यांची कार चोरीस गेली असल्याचे लक्षात आल्यावरून त्यांनी चोरीबाबत फिर्याद दिली होती. त्याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून कोथरूड पोलीस स्टेशनशी संपर्क केला असून मिळून आलेली स्वीफ्ट कार व संशयीत इसम यास संबंधीत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा, पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्याजा मुजावर, शिवाजी घोळवे, पो हवा. प्रकाश कारटकर, नारायण गोलेकर, राजेश गायकवाड, धनाजी गाडे, पोकॉ धनराज गायकवाड, अक्षय दळवी यांनी केली आहे.