सोलापुर: सोलापूर ग्रामीण पोलीस दल राबवीत आहे ऑपरेशन मुस्कान – ९ अभियान
सोलापुर ग्रामीण पोलीस दलाकडून दि १ डिसेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान ‘ ऑपरेशन मुस्कान – ९ अभियान राबविण्यात येत आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दल राबवीत आहे ऑपरेशन मुस्कान – ९ अभियान
या अभियाना दरम्यान हरविलेल्या मुले/मुली तसेच बालकामर व महिला यांचा शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पोलीस विभागाचे वतीने ऑपरेशन मुस्कान हे अभियान राबविष्यात येत आहे. आतापर्यंत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील २५ पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड,ओद्योगिक वसाहती, हॉटेल, गरेज, सर्व व्यापारी दुकाने, वीटभट्टी इत्यादी ठिकाणी १८ वर्षाखालील काम करताना ४४ बालकामगारांचा शोध घेतला व त्यापैकी ४२ मुले त २ मुली मिळुन आल्या त्यांना त्यांचे पालकांचा शोध घेवुन त्या पालकांचे समुदेशन करुन त्यांना पालकांचे ताब्यात दिले. तसेच बेपत्ता असणाऱ्या ০२ मुले 0६ मुलीचा शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात आले, मुलांची पालन पोषण करण्याची परिस्थीती हालाखीची असल्याची पालकांकडुन माहिती मिळाली. पालकांना योग्य ते समुपदेशन करून मुलांना पूढील शिक्षण देण्याचे आणि मुलांना सुजान व जबाबदार असे नागरिक बनविण्याचे आवाहन पोलीसांनी केले.
‘ऑपरेशन मुस्कान- ९’ ही मोहिम पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक
अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकअरुण सावंत, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले, महिला सहा. पो.उपनिरीक्षक विजया मोहिते, मपोहेकॉ डी. एस. म्हेत्रे असे ऑपरेशन मुख्कान-९ ही शोध मोहिन राबवित आहेत.
सोलापुर ग्रामीण जिल्ह्यातील २५ पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी ०२ पोलीस अंमलदार असे एकुण ५० पोलीस अंमलदार व ০४ पोलीस अधिकारी यांची ऑपरेशन मुस्कान- ९ करिता नियुक्ती करण्यात आलेले आहेत.