कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद:आसिफ मुलाणी
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आद्रा नक्षत्राचा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. तालुक्यातील कारी, अंबेजवळगे, सोनेगाव परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी ट्रॅक्टर व आधुनिक पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी करत आहेत. यंदा सोयाबीनची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. उडीद, मूग, तूर आदींची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन बोगस बियाणांमुळे मोठा फटका बसला. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली शिवाय परतीच्या पावसाने सोयाबीन भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान यंदा तरी भरून निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.