कुतूहल न्यूज नेटवर्क
महाबीज कंपनीचे व इतर कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
बार्शी : बार्शी तालुक्यात खरीप पिकाच्या पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रमुख पिक असलेले सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती.शेतकऱ्यांनी वेळेत व चांगला पाऊस झाल्याने विविध कंपनीचे तसेच घरगुती सोयाबीनचे बी घेऊन पेरणी केली आहे. पण महाबीज कंपनीचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी घेऊन पेरणी केलेली आहे त्याचे बी उगवले नाही.
शेतकऱ्यावर पहिलेच कोरोनाचे संकट आल्याने शेती पिकाला कसलाच भाव नाही, बँका पिक कर्ज देत नाहीत, तालुक्यातील 43 हजार शेतकरी सन 2018-19 मधील दुष्काळ निधी पासून वंचित आहेत.अशा एक ना अनेक संकटे वर्षा नु वर्षे येत असताना परत अजून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
हेही वाचा- विवाह सोहळ्यातच राबविला वृक्षारोपनाचा उपक्रम
तरी तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी बार्शी यांनी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे सोयाबीन बी पेरणी केली आहे, त्यांची बी उगवले नसल्याने सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी राहुल भड, विष्णू पवार, दीपक जाधव, लता यादव आणि अशोक माळी यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.