कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुका पोलीस ठाणेच्या नवीन इमारतीचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन
बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाणे (Barshi Taluka Police Station) हे दि ०१.जानेवारी २०२१ रोजीपासुन नागोबाचीवाडी रोड बायपास बार्शी या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असुन सदर स्थलांतरीत इमारतीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (SP Tejasvi Satapute) यांच्या हस्ते करण्यात आले. तर इमारतची फित कापण्याचा मान बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील एएसआय दिलीप ठोंगे यांना मिळाला.
बार्शी तालुका पोलीस ठाणे हे दि ०१.मे २०१८ रोजी सुरू करण्यात आले होते. तेव्हापासुन सदरचे पोलीस ठाणे हे पांडे चौक, बार्शी येथील जुने बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये कार्यान्वीत होते. सदरची ईमारत वापरण्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने व सदर इमारतीची जागा अपुरी असल्याने तक्रार नोंदविणे करीता येणारे नागरीकांची गैरसोय होत होती.
तसेच पोलीस ठाणेस येणारे नागरीकांना पार्किंगची व्यवस्था नव्हती. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस ठाण्याची जागा अपुरी असल्याने पोलीस ठाणेस तक्रार नोंदविणे करीता अगर कामाकरीता येणारे नागरिकांची गैरसोय होउ नये, पार्किंगची व्यवस्था व्हावी व योग्य त्या सोयीसुविधा नागरिकांना मिळाव्यात याकरीता सदर पोलीस ठाण्याचे कामकाज नागोबाचीवाडी रोड बायपास या ठिकाणी असलेल्या प्रशस्त इमारतीतुन सुरू करण्यात यावे याबाबत सुचना दिल्या होत्या.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे नियीमत कामकाज नवीन ईमारतीतुन सुरू आहे. तरी बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कामकाजाकरीता व तक्रार नोंदणीकरीता नागोबाचीवाडी रोड बायपास बार्शी या ठिकाणी यावे.
बार्शी तालुका पोलीस ठाणे हे नागरिकांच्या सेवेकरीता सदैव तत्पर असेल असे आवाहन करण्यात आले आहे. ई-मेल आय.डी ps.barshitaluka@mahapolice.gov.in किंवा फोन नंबर ०२१८४-२२३३३० वर संपर्क करावा.