fbpx

गावठी हातभट्टीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची मोठी कारवाई,12 लाखांची दारू नष्ट

कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुळेगाव तांडा(ता. दक्षिण सोलापूर) या परिसरातील 14 गावठी हातभट्टीवर कारवाई करत सुमारे 12 लाख 39 हजार 200 रुपयांची दारू नष्ट केली.

तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकाचा पदभार स्वीकारक्या पासून अवैध व्यवसावर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.दि.9 जानेवारी रोजी मुळेगाव तांडा (ता.दक्षिण सोलापूर) गावाच्या शिवारात 14 गावठी हातभट्टी बनविणाऱ्या ठिकाणावर कारवाई करत गुन्हे दाखल करून सुमारे 12 लाख 39 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला आहे.

सदरच्या कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे,  पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक फुगे, रापोनि काजोळकर, सहा.पो.नि बंडगर, बुवा, चौधरी, म सहा. पो. नि. तावरे, पो. स.ई/दळवी, इंगळे, पिगुवांले, म.पो.स.ई गोडबोले तसेच सोलापूर ग्रामीण कडील आर. सी. पी. पथक, क्यु. आर. टी. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारानी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *