कुतूहल न्यूज नेटवर्क
Video | मराठा योध्दा तरुण मंडळ आयोजित रक्तदान शिबीरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बार्शी : तालुक्यातील जवळगांव नं.१ मधील मराठा योध्दा तरूण मंडळ आयोजित रक्तदान शिबीरात 81 जणांचे रक्तदान. कोरोना सारख्या महामारी च्या काळात समाजासाठी एक देणे, एक सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.जवळगाव मधील तरूण वर्गाचा त्याचबरोबर ग्रामीण भाग असून ही गावातील महिलांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला ही विशेष बाब.
सदर रक्तदान शिबिरासाठी दीपक कापसे, अविनाश कापसे, अतुल कापसे, प्रशांत कापसे, गणेश कापसे, नितीन आवटे, प्रसाद कापसे, सुमंत डिसले, विशाल कापसे, लक्ष्मण कापसे, आण्णासाहेब कापसे व मराठा योध्दा तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले