fbpx

बार्शी आगारात एसटी महामंडळाच्या सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ

बार्शी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बार्शी तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, सोलापूर विभागाचे उपयंत्र अभियंता तथा बार्शी आगाराचे पालक अधिकारी उत्तम जुंदळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ननवरे, आगार व्यवस्थापक मोहन वाकळे, स्थानक प्रमुख प्रमोद शिंदे, जेष्ठ पत्रकार नाना गव्हाणे आदींच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

यावेळी वाहतुक निरीक्षक नितीन गावडे, लेखाकार श्रीकांत कोप्पा, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक रामचंद्र गवळी, सौ. अर्चना परबत, वाहतुक निरीक्षक जयसिंग परदेशी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात आगारप्रमुख वाकळे म्हणाले की, सध्या आगारात साध्या बसेस 118, शिवशाही बसेस 09 असून त्यामाध्यमातून प्रवाशी वाहतुक चालू आहे  तसेच अधिकारी, यांत्रिक कर्मचारी, चालक, वाहक यांची कर्मचारी संख्या 551 इतकी असून सर्व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी बार्शीतील सुविधा हॉस्पीटल च्या सहाय्याने माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे तसेच त्यांची नेत्र तपासणी, रक्त तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चालक, वाहकांना सुरक्षितता मोहिमेचे बिल्ले,आवाहन पत्रके वाटून सुचना देऊन तसेच स्टिकर, डिजिटल बॅनर इत्यादी लावून जनजागृती करण्यात आली आहे. महामंडळाची सुरक्षितता मोहिम दिनांक 11 जानेवारी ते 25 जानेवारी अशी एकुण पंधरा दिवस राहणार आहे.

प्रमुख पाहुणे गिरीगोसावी म्हणाले की सर्व चालकांची व वाहकांची महामंडळ आरोग्य तपासणी करीत असल्याबद्दल अभिनंदन केले तसेच चालकांनी आपल्या कर्तव्यावर असताना कुठल्याही प्रकारचे व्यसने करु नये प्रवासात अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी अश्या सुचना देऊन एसटी.महामंडळाने सुरक्षित प्रवास होण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
देशपांडे यांनी चालकांना दारु पिऊन गाडी चालवू नये, गाडी चालू असताना मोबाईलवर बोलू नये, वाहतुक नियमांचे पालन करावे असे सांगितले. कार्यक्रमास पोलिस प्रशासनाचे कर्मचारी प्रविण पवार, दशरथ बोबडे, सचिन नितनाथ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी राजेंद्र कवळासे, बाळासाहेब भोसले, विजय बुटे, पंकज सावंत, पवण वाघुलकर, सौ.हालमे , सौ.मिनाक्षी मोरे, कल्याण सुतकर, उमाकांत भोसले आदीं कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन महेंद्र क्षिरसागर यांनी तर वाहतुक निरीक्षक नितीन गावडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *