कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: गौडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांना रत्नागिरी येथील नवनिर्मिती फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण ३ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. राहुल भड हे मागील १७ वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्राकरिता सक्रिय सेवा करत आहेत. शिवाय सहारा वृद्धाश्रम सुरू केला असून येथे दाखल होणाऱ्या वृद्धाकरिता जेवण, कपडे, राहणे तसेच त्यांना आरोग्याची मोफत सुविधा या माध्यमातून उभी केल्यामुळे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नवनिर्मिती फाउंडेशन यांनी पुरस्कार जाहीर केला आहे.
राहुल भड यांना नवनिर्मिती फाऊंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
यापूर्वी त्यांना परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, गुणिजन रत्नगौरव पुरस्कार, राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार, प्रतिभा संग्राम पंढरी गौरव पुरस्कार, ग्राहक समितीच्या वतीने आदर्श पुरस्कार, स्व. जयवंत (दादा) काटमोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार, जिविका फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार, मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने वृद्ध-सेवा पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरव करण्यात आला आहे. (State level award of Navnirmiti Foundation announced to Rahul Bhad)