fbpx

पांगरीतील जि. प. शाळेच्या शिक्षिका पंचफुला गायकवाड यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा उपक्रम

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने ५ ऑक्टोंबर या जागतिक शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पांगरीतील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका पंचफुला गायकवाड-बगाडे यांना जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शिक्षकाकडून ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात आले आणि त्या मधून गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली.त्यांच्यावर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *