fbpx

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना अखिल भारतीय छावा संघटने कडून निवेदन

कुतूहल न्यूज नेटवर्क – विजयकुमार मोटे

पंढरपूर : राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध व ई पास (e-pass ) रद्द करणेबाबत व तसेच कर्जदारांना हप्ते भरण्याकरिता जानेवारी 2021 अखेरपर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून लेखी आदेश होणेबाबतचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटने तर्फे पालकमंत्री दत्तात्रय भरणे पंढरपूर दौऱ्यावर आले असता देण्यात आले.

सदर निवेदनामध्ये, कोरोना सारख्या महाभयंकर आजारांमुळे संबंध देशातील नव्हे तर जगातील सर्व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या महामारी मुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट व हलाखीची झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना दोन वेळेच्या पोटापाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. अशातच वित्तीय संस्था, फायनान्स मायक्रोफायनान्स, महिला बचत गट, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, सरकारी बँका या वारंवार कर्ज हप्ता भरण्यासाठी तगादा लावत आहेत. अशाने कर्जदारांची मानसिकता बदलून व मानसिक त्रास होऊन काही लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न देखील केला आहे. या सर्व बाबींचा विचार करून 2021 जानेवारी अखेरपर्यंत कर्जाचे हप्ते भरण्या करतां मुदतवाढ मिळावी असे जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी आदेश व्हावेत.

तसेच कोरोना विषाणू संसर्ग रोग प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शासनाकडून अनेक अशा उपाय योजना राबविण्यात आल्या होत्या त्या अंतर्गत प्रवासावर ही बंदी घालण्यात आली होती मात्र या कालावधीमध्ये संपूर्ण अर्थचक्र थांबल्याने समाजातील सर्व वर्गाला आर्थिक फटका बसलेला आहे. आता परिस्थिती हळूहळू सावरत असताना केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पूर्ण पदावर येण्यासाठी प्रवासा वरील बंदी हटविण्याच्या सूचना प्रत्येक राज्य सरकारला दिल्या असून महाराष्ट्र सरकारने याची अंमलबजावणी अजूनही केले नाही तसेच महाराष्ट्र सरकारने वाहनांमधील मर्यादित प्रवासी नियम तत्काळ रद्द करून किंवा प्रवासी मर्यादा वाढवून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यांतर्गत प्रवास निर्बंध व ई पास सक्ती ताबडतोब बंद करावी. असा उल्लेख करण्यात आला आहे.

तरी आपण या विषयाचे गांभीर्य सरकारला लक्षात आणून देऊन हे दोन्ही विषय मार्गी लावावे अशा विषयाचे निवेदन देताना अखिल भारतीय छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर तात्या जगताप,शहर संघटक निलेश कोरके, संतोष बंडगर शनी घुले,व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *