कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे २५ टक्के अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे, या मागणीचे निवेदन स्वराज्य शेतकरी महासंघाच्या वतीने तहसीलदार सुनील शेरखाने त्यांना देण्यात आले. बार्शी तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकासह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अतिवृष्टीच्या अनुदानासाठी स्वराज्य शेतकरी महासंघाच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन
त्यामुळे शासनाने हेक्टरी दहा हजार रुपये मदत जाहीर केली होती. व त्याची मर्यादा २ हेक्टर पर्यंत होती. शासनाने सन २०२१ मध्ये दिवाळी सणामध्ये अतिवृष्टीचे ७५ टक्के अनुदान वाटप केले होते, पण उर्वरित २५ टक्के अनुदान सहा महिन्यानंतर मंजूर होऊन तहसील कार्यालयास जमा झालेले आहे. ते अतिवृष्टीचे २५ टक्के अनुदान तहसील कार्यालयात जमा होऊन, एक महिना होत आलेला आहे. अजुन पर्यंत तहसील कार्यालयाने अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले नाही.
अतिवृष्टीचे २५ टक्के अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देतेवेळी राहुल भड, युवराज काजळे, संतोष पाटील, सतीश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
(Statement given to Tehsildar for grant of excess rainfall)