कुतूहल न्यूज नेटवर्क : दयानंद गौडगांव
नियमांचा उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार ; नवनिर्वाचित पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश
पिंपरी-चिंचवड दि . 10 सप्टेंबर: आयर्नमॅन म्हणून ख्याती असलेले कृष्णप्रकाश यांची नुकतीच पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी काही तासांतच माध्यमाशी संवाद साधला. सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीला ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ असा सज्जड दम दिला आहे.
याआधी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा पदभार संदीप बिष्णोई यांच्याकडे होती. दि २ सप्टेंबर ला गृहमंत्रालयाकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात संदीप बिष्णोई यांचंही नाव होतं. त्यांच्या जागेवर पिंपरी-चिंचवड आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याठी मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कृष्णप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली.
कृष्णप्रकाश यांनी पहिल्याच दिवशी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी असेपर्यंत गुन्हेगारांनी दुसरा धंदा बघावा, कायदा हा सर्वांसाठी समान आहे, तो गरीब असो वा श्रीमंत, वा राजकीय व्यक्ती, जो कोणी गुन्हा करेल त्याला शिक्षा होणारच. शिवाय मी कोणत्याही दबावाला थारा दत नाही, आजपर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आला नाही, तो यापुढे येईल असे वाटत नाही. मी कायद्याने चालतो आणि कायदा सर्वांना समान आहे. असे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी यावेळी बोलताना म्हणाले.