नाविंदगी जिल्हा परिषद शाळेचा यशस्वी उपक्रम
कुतूहल न्यूज नेटवर्क : दयानंद गौडगांव
नाविंदगी: अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करण्याचा अनोखा उपक्रम मागील वर्षापासून राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आज अर्धशतक पूर्ण झाला. हा प्रयोग नाविंदगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गुणवंत खोसे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.