fbpx

विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेनंतरच स्पर्धा परीक्षेचा पाया तयार करायला सुरुवात करावा- देवा जाधवर (द युनिक ॲकॅडमी)

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: चालू घडामोडी हा महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परिक्षांचा अविभाज्य भाग असुन या गोष्टीची नियोजनबद्ध तयारी विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी करण्यास उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन द युनिक ॲकॅडमी पुणे चे मार्गदर्शक देवा जाधवर यांनी केले. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेनंतरच स्पर्धा परीक्षेचा पाया तयार करायला सुरुवात करावा असेही त्यांनी सांगितले. द युनिक ॲकॅडमी पुणे व स्पर्धामित्र ॲकॅडमी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मोफत सेमिनार मध्ये ते बोलत होते.

दि. २० मार्च रोजी स्पर्धामित्र‌ ॲकॅडमी येथे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने सध्या जाहिर केलेल्या एमपीएस्सी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, क्लार्क, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागातील नोकर भरती व आगामी पोलिस भरती, तलाठी व वनखाते भरती ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे सेमिनार अत्यंत महत्त्वाचे ठरले. कार्यक्रमस्थळी देवा जाधवर लिखीत चालू घडामोडीचे पुस्तक ५०% सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले गेले. विद्यार्थ्यांसाठी मोफत सराव चाचणी घेतली व राज्य-राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी घटकाचे विश्लेषण देवा जाधवर यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य मार्गदर्शन, सुसज्ज अभ्यासिका, तज्ञ मार्गदर्शक, स्पर्धात्मक वातावरण, नियमित सराव चाचण्याचे आयोजन करणारी बार्शी येथील स्पर्धामित्र ॲकॅडमीचे या निमित्ताने सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादासह अनेक पालक, माजी सैनिक, शिक्षकांनी सेमिनारला उपस्थित दर्शविली. यावेळी सचिन मस्के, लक्षमण घुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धामित्र ॲकॅडमीचे संचालक व मार्गदर्शक प्रा. ए.एम शेख यांनी केले. (Students should start studying for the competitive examination only after the matriculation examination)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *