कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांची कारी गावाला भेट
कारी दि.26 : कारी गावाचा गेल्यावर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश झाला. मात्र हे गांव सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाणेच्या हद्दीत होते.काही दिवसांनी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याशी जोडले जाणार आहे. यासाठी गावातील भोगोलिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड व पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांनी गावाला भेट दिली आहे .यावेळी गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच मंजुषा करळे, पोलीस पाटील अमृता माळी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजित डोके, ग्रा. पं. सदस्य डॉ. देवेंद्र डोके, ग्रा. पं. सदस्य विजयसिंह विधाते,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या उमरदंड, अमोल जाधव, प्रमोद करळे, शशिकांत माळी,सहाय्यक फौजदार आनंदे, राजेंद्र विधाते, रणजित विधाते, नितीन कात्रे, मारुती लोहार, परीक्षित हाजगुडे, विजय पाठक,ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.