fbpx

सख्या मावस भावांच्या जिद्दीला आले यश ; एक झाला अधिकारी तर, दुसरा सिनेअभिनेता

कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे

पंढरपूर : तालुक्यातील सख्या दोन मावस भावांची इच्छाशक्तीच्या जोरावर घोडदौड. एकाची यशस्वी तर दुसरा रणांगणात. जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्या निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोहोचणे हेच ध्येय.

खर्डी ता. पंढरपूर येथील एका शेतकरी कुटुंबातील श्री. राहुल लक्ष्मण चव्हाण यांनी यावर्षीच्या यूपीएससी परीक्षेत, यापूर्वी दोन वेळा अपयश येऊन देखील जिद्दीने व सातत्याने अभ्यास करून १०९ वा रँक प्राप्त करून यश प्राप्त केले. खर्डी गावातील पहिला अधिकारी होण्याचा मान मिळाल्यामुळे राहुल चव्हाण यांचे खर्डी गावातील ग्रामस्थांनी लाल गुलाल उधळून अभिनंदन व कौतुक केले.

तसेच, शेळवे ता.पंढरपूर येथील समाधान गाजरे हे राहुल चव्हाण यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. यांच्याही घरची परिस्थिती बेताची आहे. लहान वयामध्ये घरची जबाबदारी संभाळावी लागली. लहानपणापासूनच राजकारणात काम करण्याची इच्छा होती. समाधान गाजरे यांच्या अंगी वक्तृत्व कौशल्य असल्यामुळे राजकारणाचे व्यासपीठ भेटले.

परंतु, त्यांच्या भाषाशैलीमुळे काही काळात आयुष्याने कलाटणी घेतली. व्यासपीठावरील राजकीय भाषाशैली पाहून चित्रपट दिग्दर्शक बापूसाहेब घायतिडक यांच्याकडून, भाग्यश्री आर्ट निर्मित ‘लाल गुलाल’ या चित्रपटा मध्ये राजकीय अभिनेता म्हणून काम करण्याची ऑफर मिळाली. चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी पाहून ती स्वीकारली. याद्वारे त्यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले.

एका नवख्या क्षेत्रात पदार्पणानंतर आपल्यातील कला सादर करण्याचे धाडस करताना दिसत आहेत.’लाल गुलाल’ या चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वी रित्या पूर्ण होण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. लाल गुलाल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्यांची मेहनत पाहून कोल्हापूर येथील आणखी एका दिग्दर्शकाने चित्रपटाची ऑफर दिली आहे.

नक्कीच हा उमदा व नवखा कलाकार महाराष्ट्राच्या सिनेसृष्टीत यशस्वी होईल व यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून आपल्या विजयाचा झेंडा नक्कीच फडकवेल यात शंका नाही.पंढरपूर तालुक्यातील या सख्या मावस भावांच्या जीवनात ‘लाल गुलाल’ संस्मरणीय ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *