कुतूहल न्यूज नेटवर्क :
सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांच्या लढ्याला यश, अखेर रामनदी झाली जलमय
बार्शी : पिंपरी (आर ) ता.बार्शी या गावची 2016-17 मध्ये जलयुक्त शिवार योजनेत निवड होऊन ही गावामध्ये जलसंधारणची कामे झाली नाहीत.या कारणामुळे पिंपरीतील शेतकरी बांधवांना दुष्काळाचा प्रचंड सामना करावा लागला.याची वारंवार तक्रारी करुन शासन दरबारी दखल घेत नसल्यामुळे पाटील यांनी मंत्रालया समोर पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहनचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे होईन संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी आदेश दिले. तत्काळ दोन सिमेंट बंधारे,नाला खोलिकारणाची कामे मंजूर केले.पाच वर्षे पाटील यांनी पाठपुरावा करुन संबंधित कामे करून गावातील शेतकरी बांधवांमधे शेती विषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला आहे.विकास कामे करताना ग्रामपंचायत प्रशासन,कार्यकारी अभियंता खरात , उपअभियंता सोनवने यांचे सहकार्य लाभले.