काशीनाथ क्षीरसागर : कुतूहल न्यूज नेटवर्क
मुख्याध्यापक संघाच्या क्रीडा सचिवपदी सुरेश गुंड
मुंगशी: सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या क्रीडा सचिवपदी बार्शी तालुक्यातील बावी येथील प्राचार्य सुरेश गुंड यांची तर ज्योत्स्ना डोके यांची स्पर्धा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ही निवड राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांनी जाहीर केली आहे. यावेळी रंगसिध्द दसाडे, महेश सरवदे, बापू नीळ, विश्रांत गायकवाड, किशोर डुरे-पाटील, राजकुमार पुजारी, अण्णासाहेब मोरे, मुकुंद मोहिते, राजेश उकिरडे, धनंजय चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल संस्थाचालक बाळासाहेब कोरके, डॉ. कपिल कोरके, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा कोरके, प्राचार्य विनायक डोईफोडे यांनी सुरेश गुंड यांचे अभिनंदन केले आहे.