कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या १६ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. सुरेश कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून भूम-परंडा-वाशी मतदार संघात तानाजी सावंत व राहुल मोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. भूम येथे कार्यकर्ता मेळावा घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.
धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount