कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मेंदूच्या, हृदयाच्या आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी आता पुणे आणि मुंबई या महानगरात रुग्णांना जायची गरज नाही. या शस्त्रक्रिया बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपलब्ध झाल्या असून डाॅ. आदित्य साखरे (हृदय रोग) तज्ञ डॉ. किशोर गोडगे (न्यूरोसर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली काही रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये होणार मेंदू, हृदय विकारावर शस्त्रक्रिया
त्याचबरोबर बार्शी शहराला डॉक्टर आदित्य साखरे यांच्या रूपाने हृदयरोग तज्ञ देखील मिळाले. डॉक्टर आदित्य साखरे हे बार्शीतील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशालेमध्ये झालेले आहे. त्यांना अनेक हॉस्पिटलमधून बोलवण्यात आले होते परंतु माझ्या गावांमध्ये राहून मला रुग्णांची सेवा करायची आहे. असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्यामुळे येणाऱ्या काळात बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल हे रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे या उपलब्ध झालेल्या वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांनी घ्यावा असेही आवाहान संस्थेचे अध्यक्ष डाॅ. बी. वाय. यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांनी केले आहे.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount