परंडा : परंडा तालुक्यातील घारगाव येथे तलवार हल्ल्यामध्ये युवक तुषार लटके हा जखमी गंभीर झाला आहे. दि. 30 एप्रिल रोजी सकाळी साडेसात च्या दरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबत जखमी युवकाचे भाऊ विशाल लटके यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत असे म्हटले आहे की, अमर लटके याने आता एकाएकाचा जीवच घेतो असे म्हणत तलवारीने फिर्यादीचे भाऊ तुषार लटके याच्या डोक्यात व हातावर वार केला. तेव्हा फिर्यादी व फिर्यादीचे वडील मारू नका असे म्हणून भांडणे सोडवत असताना त्यांना प्रकाश लटके, वंदना लटके, आकाश लटके, तृप्ती चौधरी यांनी लाथाबुकाने मारहाण केली.
जखमी तुषार या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या बार्शी येथील डॉ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबात परंडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.