fbpx

मातीवरून दोन गटात तलवारीने हाणामारी; २० जणांवर गुन्हा दाखल

कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: सोलापूर येथील रमाबाई आंबेडकर नगरात माती घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तलवारीने हाणामारी होऊन यात दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाले. दोन्ही गटांनी एकमेकावर तक्रारी दिल्या असून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. (Sword fighting in two groups; Crimes filed against 20 persons)

श्रीशैल गुंडू बनसोडे (रा.आम्रपाली चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) हे जुना बस डेपो येथे माती घेण्यासाठी गेले असताना अजित गादेकर यांनी तू येथे जेसीबी कशासाठी आणला आहे. माती कशाला घेऊन जात आहे. या कारणावरून डोक्यावर तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले असे श्रीशैल बनसोडे यांनी फिर्यादीत म्हणटलं आहे. त्यावरून अजित गादेकर, विजय गादेकर, अमोल शिंदे, संजय बनसोडे, सुनील शिवशरण, आकाश शिंदे, संजय बनसोडे, रोहन गायकवाड व दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अजित गादेकर यांनी फिर्यादीत म्हणटलं आहे की, माती उकरण्याच्या कारणावरून श्रीशैल बनसोडे हटकले असता, मागील वेळेस तू वाचला आहेस आता जर तू आडवा आला तर तुला वामने दादांनी जीवे मारण्याचे सांगितले आहे. असे म्हणून आणलेली तलवार फिरवून जिवे मारण्याची धमकी दिली. यात परमेश्वर बनसोडे, मल्लिनाथ बनसोडे, गुड्डू बनसोडे ,बाळासाहेब लोखंडे, आथेस लोखंडे, अजय मस्के, विकी मस्के, यलादास वामने, छोटू सह १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे व ताकभाते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *