कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बार्शी तालुक्यातील काटेगांव येथील जिल्हा परिषद शाळेत पालक वर्गाच्या उपस्थितीत नवीन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना झाली.
काटेगांव जि. प. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तमन्ना गोरे तर उपाध्यक्षपदी वैशाली चकोर
सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तमन्ना अमीन गोरे तर उपाध्यक्षपदी वैशाली विशाल चकोर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून विनोद भनसोडे, सुनीता अनिल पवार, रामदास माणिक जाधव, किरण हरीशचंद्र कोल्हे, अश्विनी स्वप्निल बचुटे, शंकर गहिनीनाथ शेलार, शिक्षणप्रेमी निलेश रमेश गाढवे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्ष गुंफा पंडित, मुख्याध्यापक विश्वास जाधवर, शिक्षक अंजली पवार, वर्षा आंधले, संजय जाधवर सह पालक वर्ग उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount