कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: आसिफ मुलाणी
यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री शिवाजी विद्यालय कारी येथील शिक्षक दयानंद तुळशीराम सोनवणे हे 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवा निवृत झाले. त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने आज त्यांचा या प्रदीर्घ सेवेबद्दल गौरव करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक एम. एस. भुसारे, शिक्षक आर. सी.आगलावे, ए. एम. जोशी, एल. एम. ढेंबरे यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.
श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक दयानंद सोनवणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार; 28 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त
दयानंद सोनवणे हे एक शिस्तप्रिय, संवेदनशील आणि मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित आहेत. त्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. ते विद्यालयात हिंदी विषय शिकवत होते. ते आज सेवानिवृत्त झाल्याने आजी-माजी विद्यार्थ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. कारी गावामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा बजावून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले अशा प्रकारची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी ए. आर.जाधव, एन.आर. चव्हाण, एस.एम .मनगिरे, आय. एम.शेख, व्ही.बी गायकवाड, एस. पी. जगदाळे, ए. पी. कांदे, एस. लोहार, एस. एस काळे, करळे जी. ए, वाघे एस. एस, शिक्षिका भोसले, शिक्षिका ताटे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुतार, वाघमारे, बोडके,करळे उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. एम जोशी तर आभार व्ही. बी वसावे यांनी मानले.