कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
मळेगावात शिक्षक दिनानिमित्त गुरुवर्यांचा सत्कार
कारी : बार्शी तालुक्यातील मळेगाव याठिकाणी शिक्षक दिनानिमित्त शिक्षणाचे खरे जनक भारताचे रत्न क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांनी हाल अपेष्टा सहन करून समाज्याला शिक्षित करण्याच काम केले,त्याच शिक्षणातून तयार झालेले मळेगाव येथील व आष्टी ता.मोहोळ येथे कार्यरत असलेले शिक्षक दत्तात्रय कुंभार यांचा आज शिक्षक दिनानिमित्त श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ मळेगाव ता.बार्शी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सावता परिषदेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी, धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका अध्यक्ष सागर शेळके,श्री शिवाजी तरुण मंडळाचे यशवंत गाडे,ग्रामपंचायत चे क्लार्क सुरेश कांबळे ग्रामपंचायत चे संगणक परिचालक प्रशांत पटणे,जोतिराम वाघ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.