कुतूहल न्यूज नेटवर्क
उत्कर्ष मोरे या शिक्षकाचे गेली सहा महिन्यापासून वेतन बंद ; आमरण उपोषण करणार
कुर्डूवाडी : उत्कर्ष रोहिदास मोरे, रा.कुर्डूवाडी ,ता. माढा,जि. सोलापूर हे मा. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागीय कार्यालय, घोले रोड, पुणे 5 यांचे कार्यालयासमोर दि. 24 जून 2020 पासून आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र त्यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना दिले आहे.बार्शी टेक्निकल हायस्कूल येथे पुनर रुजू करुन घेणे बाबत मा.सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे यांनी संबंधित मुख्याध्यापकांना आदेश दिले होते पण त्या मुख्याध्यापकांनी त्यांना जाणीवपूर्वक रुजू करुन घेतले नाही असे त्यांनी कुतूहल न्यूजशी बोलताना सांगितले.
मोरे हे अतिरिक्त तंत्र निदेशक ( शिक्षक ) असून गेली 6 महिने त्यांचे वेतन बंद आहे.कायमस्वरुपी समावेशनाबाबत आणि दरमहा वेतन मिळणेबाबत मा. सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागीय कार्यालय, घोले रोड, पुणे 5 यांना गेली 6 महिने विनंती अर्ज,याचना करीत आले आहे. संबंधित विभागाकडून त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे असे त्यांनी पत्रात ( निवेदनात ) सांगितले आहे . तसेच त्यांच्या कुटुंबाचे सध्या प्रचंड हाल सुरु असून उपासमार चालू आहे. त्यामुळे ते दि.24 जून 2020 पासून आमरण उपोषण करणार आहेत.
