कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : मळेगाव ता. बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले यांनी बहुजन समाज्याचे अज्ञान दारिद्र्य आणि समाज्यातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला व इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलीची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीमाई वर सोपवली आणि महात्मा फुले यांनी अस्पृश्यसाठी शाळा सुरू केल्या. भारताचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांना देखील शिक्षणाबद्दल अतिशय जिव्हाळा होता शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. सर्वप्रथम महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मळेगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
यावेळी सरपंच संजयकुमार माळी, उपसरपंच धीरज वाघ, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, माजी उपसरपंच श्रीमंत गडसिग, ग्रा.प.सदस्य समाधान पाडुळे, दशरथ इंगोले, प्रा.संजय माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष खडके, मंडळाचे सचिव सचिन कानडे, मंडळाचे यशवंत गाडे, राहुल पावटे, भैय्या गाभने, ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे, संगणक परिचालक प्रशांत पटणे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount