कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जेसीबी ऑपरेटर प्रशिक्षण केंद्र (LBCT TRAINING CENTER) पुरी चे उद्घाटन तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या हस्ते पार पडले तसेच सिम्युलेटर वर्गाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक करीत असतानां प्रा. हमीद काजी यांनी ग्रामीण भागातील तरुणांनी, बेरोजगारांनी तसेच कोरोनामुळे रोजगार गेलेल्या लोकानी जेसीबी मशीन ऑपरेटर प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उज्वल भविष्य घडवावे असे मत व्यक्त केले तसेच फक्त प्रशिक्षण व प्रमाणपत्र न देता नोकरी उपलब्ध करून देण्याची हमी सुद्धा दिली.
बार्शी तालूक्यातील पुरी येथे जेसीबी ऑपरेटर प्रशिक्षण केंद्राचे तहसीलदारांच्या हस्ते उद्घाटन
यावेळी तहसीलदार शेरखाने यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि महाराष्ट्रातील एकमेव केंद्राचा लाभ घ्यावा जी काही प्रशासकीय मदत लागेल ती देण्याची ग्वाही दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सपोनि सुधीर तोरडमल यांनी ग्रामीण भागातील प्रशिक्षण केंद्र हा राज्यस्तरावरील प्रमुख केंद्र व्हावा अशा शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणार्थीनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षाताई ठोंबरे यांनी नवोउपक्रम कसा आणला व यशस्वी केला याविषयी माहिती सांगितली तसेच सामाजिक बांधिलकी व वास्तवाचे भान ठेवून संस्थेने मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरविले यामुळे अनेक कुटूंबांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न मिटेल पांगरी परिसराची ओळख जेसीबी ऑपरेटरचा परगणा म्हणुन व्हावी अशी ईच्छा व्यक्त केली.
आभार प्रदर्शन प्रा. तात्या घावटे यांनी केले तर सूत्रसंचालन मंगेश कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रमोद गिलबीले प्रा. सुमित वाघमारे, प्रा. सोमेश्वर शेटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रा. सुनील नष्टे, प्रा. अतुल ढवळे, प्रा. संजीव बगाडे, अल्लामीन शेख, पत्रकार सचिन ठोंबरे, पत्रकार इरशाद शेख, पहिल्या बॅचचे विद्यार्थी, पॉलिटेक्निक कॉलेज, डी फार्मसी कॉलेज आणि श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयचे प्राध्यापक वृंद हजर होता.