कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : असिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें), पाडोळी(आ), मेंढा, लासोना, घुंगी, समुद्रवाणी,सांगवी, कामेगाव, बोरगाव (राजे), बोरखेडा आदी गावात दि.९ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कोथिंबीर आदी पिकामध्ये एकूण क्षेत्राच्या ५० ते ५५ टक्के असे पाणी थांबले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.