सोलापूर ग्रामीण पोलीस सीसीटीएनएस प्रणालीमध्ये राज्यात उत्कृष्ट व कोल्हापूर परिक्षेत्र मध्ये प्रथम.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना पोलीस अधिक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक
कुतूहल न्यूज नेटवर्क :
सहायक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेक व पोलीस हवालदार इक्बाल शेख यांचा मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक १०/११/२०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पार पडलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने सन २०१५ सालापासून सीसीटीएनएस प्रकल्पांतर्गत सर्व पोलीस ठाणेस ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आलेली असून ऑनलाईन कार्यप्रणालीला गती येण्याकरिता अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे. यांचे कार्यालयाकडून प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात येतो. सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटक जिल्ह्यास गौरवण्यात येते. त्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे माहे ऑगस्ट २०२० मध्ये सीसीटीएनएस कार्यप्रणालीत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रात चतुर्थ क्रमांक व कोल्हापूर परिक्षेत्र मध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून महाराष्ट्र राज्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नावलौकिक झाले आहे.