कुतूहल न्यूज नेटवर्क
‘थलाईवा’ रजनीकांत पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल
हैद्राबाद : सुपरस्टार रजनीकांत यांना रक्तदाबात खूप अस्थिरता आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध चित्रपट सुपरस्टार अभिनेते रजनीकांत त्यांच्या अन्नात्थे (Annatthe) या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला सिनेमाच्या सेटवरील चार लोक कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळल्याने शूटिंग रद्द करण्यात आले. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयानेदिलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह (corona negative) आली आहे. (Superstar Rajinikanth admitted to Apollo hospital in Hyderabad after bp fluctuations)
यापूर्वी, रजनीकांत यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (Kidney Transplant) शस्रक्रिया पार पडली होती. ऑक्टोबर महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं डॉक्टरांना आढळळं होतं. त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांना करोना काळात बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता.