कुतूहल न्यूज नेटवर्क
उळे येथे खोंडाला दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीने केले आंदोलन
सोलापूर : सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला ५ रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर येणार आहे.स्वाभिमानीचे दिनेश शिंदे यांच्या नेत्तृत्वात चक्क खोंडाला दुधाची आंघोळ घालुन केले आंदोलन.
सरकारने दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्यावे,दुध पावडरला प्रति किलोला ५० रुपये अनुदान द्यावे. तुप, दुध पावडर, व बटर यावरील जीएसटी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहे.सरकारने राजु शेट्टी साहेब यांच्या दुध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा ईशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आला आहे.
आंदोलनामध्ये दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष दिनेश शिंदे, उळे शेतकरी संघटना अध्यक्ष महादेव शिंदे, अनिल शिंदे, वैभव शिंदे, युवराज शिंदे शंकर शिंदे, आणि शेतकरी उपस्थित होते.