fbpx

धुमधडाक्यात साजरा झाला बार्शीत ८००० झाडांचा वाढदिवस

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: आजकाल दिवसेंदिवस वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक बदल सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील पर्यावरणप्रेमी “मोर्निंग सोशल फाउंडेश”ने (Morning Social  Foundation) तब्बल ८००० झाडांचा धूमधड्याक्यात केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. त्याचबरोबर यावर्षी नवीन ५००० रोपांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. बार्शीतील मोर्निंग सोशल फाउंडेशन हे गेल्या ६ वर्षापासून झाडं लावण्याचं आणि जगण्याचं काम करत आहे.
यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी व्ही.आर‌. शिंदे, जेष्ठ संपादक राजा माने, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, गटविकास अधिकारी शेखर सावंत, उपअभियंता सौरभ होनमुटे, नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप गांधी, नगरसेवक सुभाष लोढा, विलास रेणके, कौरव माने, कुंडलिकराव गायकवाड, शिवाजी गायकवाड, ॲड. अनिल पाटील, नवनाथ चांदणे, प्रभाकर डमरे, प्रकाश मनगिरे, भारत पवार, मल्लिनाथ गाढवे, रावसाहेब मनगिरे, अरूण बारबोले, प्रशांत कथले, विजय राऊत, मधुकर डोईफोडे, तुकाराम जाधवर, एस.डी.कोकाटे, मॉर्निंग सोशल फाउंडेशनचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *