कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : श्रीपतपिंपरी गावाच्या अलीकडे असणाऱ्या, बार्शी अन् माढा तालुक्याला जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून मागील कित्येक दिवसांपासून पाणी वाहत असून ग्रामस्थ व प्रवाशांचे पुलावरील पाण्यातून दळण-वळण सुरू आहे. पुलास संरक्षण कठडे अथवा अँगलचे गार्ड नसल्याने जीव मुठीत घेऊन सर्वजण ये-जा करताना दिसून येतात. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे. तालुक्यातील कुसळंब, बार्शीतील घोर ओढा, कासारवाडी, कोरफळे, अलीपूर, खांडवी येथील लहान-मोठ्या ओढ्यांतून पाणी श्रीपतपिंपरी येथील ओढ्याला येत असल्याने ओढा वर्षातील आठ महिने वाहत असल्याचे गावकरी सांगत आहेत.
श्रीपतपिंपरी येथील पूल बनला धोकादायक; दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी
स्थानिक शेतकरी दयानंद पिंगळे, कुलदीप पिंगळे, उमेश पिंगळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही गटविकास अधिकारी यांना वारंवार सांगून देखील व मोबाईल मधील व्हिडिओ दाखवून देखील गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही, असे दयानंद पिंगळे यांनी सांगितले.
याच श्रीपत पिंपरी पुलाचे डाग डुज करण्याचे काम झाले होते, ते काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्याची माहिती अधिकार अंतर्गत विनंती अर्जाद्वारे मागवली होती. परंतु त्यासंबंधित ग्रामसेवक यांनी कोणतीही दखल घेतली नाही व प्रशासन अधिकारी यांनी चुकीचे उत्तर दिले, यावर कित्येक वेळा समक्ष भेटून तक्रारी केल्या, परंतु त्यांनी त्याबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही ना कोणती दखल घेतली, त्यात बांधकाम उपविभाग बार्शी यांनी माहिती दिली ती माहिती अपूर्ण आहे, याबाबत अधिक पाठपुरवठा चालू आहे, लवकरच याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागेल, व सत्य काय हे सर्व नागरिकांसमोर आणले पाहिजे याच वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे कित्येक वाहनांचे नुकसान होत आहे. नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे, जर यात काही जीवित हानी झाली तर हेच सबंधित अधिकारी या निष्पाप लोकांच्या होणाऱ्या नुकसानीला व जीवित हानीला जबाबदार राहतील का ? – दयानंद पिंगळे, स्थानिक शेतकरी
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount