कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे:कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी डॉक्टरांच्या आगळ्या – वेगळ्या चॅरिटी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून घेण्यात आलेल्या या फॅशन शो मध्ये राज्याच्या विविध भागातून शंभराहून अधिक महिला डॉक्टर्स सहभागी होत रॅम्प वॉक केला. ड्रोम अरेना, मेफील्ड इस्टेट, खराडी, पुणे येथे हा चॅरिटी फॅशन शो अतिशय उत्साहात संपन्न झाला. या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील महिलांना एक लाख सॅनिटरी नॅपकिन्स आणि HPV लसीकरण करण्यात येणार आहे.
Fashion show : राज्यातील डॉक्टरांचा चॅरिटी फॅशन शो मोठ्या उत्साहात संपन्न
कशिश सोशल फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाला डॉक्टर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे या चॅरिटी फॅशन शो मधून दिसून आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जागतिक ख्यातीचे सुप्रसिद्ध मुत्र रोग तज्ञ डॉ. संजय कुलकर्णी, जागतिक ख्यातीच्या सुप्रसिद्ध लपरो स्कोपीक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, प्रतिमा सतेज पाटील, आय एम ए महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस PCMC सुनील हिरूरकर, आबा निकम, माजी नगरसेवक सुरेन्द्र पठारे, डॉ. रितू दवे, डॉ परिमल सावंत, रुपेश डागर, लाईफकोच ट्रेनर पंकज भडागे, लय भारी पुणेरीच्या रश्मी कालसेकर, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार आदि उपस्थित होते.
चॅरिटी फॅशन शो साठी राज्याच्या विविध भागातून सुमारे ३०० हून अधिक डॉक्टरांनी उपस्थिती लावली. या शोमध्ये रॅम्प वॉकचे दोन राऊंड झाले यामध्ये पहिला राऊंड हा डिझायनर ड्रेस मध्ये तर दूसरा राऊंड (सोशल वर्क राऊंड) त्यांच्या व्हाईट एप्रॉन मध्ये पार पडला.
या फॅशन शो बद्दल बोलताना योगेश पवार म्हणाले, मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर जनजागृती करण्याचे काम कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आजपर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात ४० हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले, उर्वरित ६० हजार या शो नंतर वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अलीकडच्या काळात अनेक महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध म्हणून एचपीव्ही लसीकरण केले जाते. पिंक रेवोल्युशन तर्फे डॉ. श्रद्धा जवंजाळ ह्यांच्या वतीने HPV लसीकरण दुर्गम भागातील महिलांना देणार आहोत, यांची नोंदणी आजपासून सुरू करण्यात आली आहे.
या चॅरिटी फॅशन शो साठी मुंबई ओन्को केअर सेंटर, क्रस्ना डायग्नोस्टिक लि, लाईफकोच ट्रेनर पंकज भडागे, व्हीएनडब्लुसी (बॉबी करनानी) यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच या चॅरिटी फॅशन शो चे डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. राजेश्री ठोके, डॉ रितू लोखंडे, डॉ. वर्षा कुऱ्हाडे, डॉ. कविता लोंढे कांबळे, डॉ. केदार तांबे, डॉ. वैष्णवी शेटे, डॉ. जुई गिजरे ऍडवायझरी बोर्ड मेंबर म्हणून जबाबदारी पार पाडली. तर डॉ. सारिका इंगोळे, डॉ. गौरव पवळे, डॉ. समता चौधरी, डॉ. अर्चना पांडे, डॉ. नेहा सावंत, डॉ रेश्मा मिरघे, डॉ. स्नेहल कोहळे, डॉ. प्रज्ञा भालेराव, डॉ. प्रियांका बेंडाळे यांनी कोर कमिटी मेम्बर्स म्हणून काम पाहिले. आणि अंजली वाघ, पूजा वाघ, प्रियंका मिसाळ यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या आणि महेश सोनी यांनी केले.