कुतूहल न्यूज नेटवर्क
फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडले
सोलापूर प्रतिनिधी : चेन्नई,तामिळनाडु येथील एलिफंट गेट पोलीस स्टेशन हदीमध्ये अज्ञात लोकांनी पैशाचे कारणांवरून तीन ईसमांवर गोळीबार करून खुन केला असुन, खुन करणारे आरोपी हे लाल रंगाच्या व्हॉल्सवेगन कारमधुन हैद्राबाद ते सोलापूर रोडने पुण्याचे दिशेने फरार झाले आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तत्काळ संपुर्ण जिल्हयामध्ये नाकाबंदी लावणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सुचना दिल्या आणि स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदाराचे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन लगेचच हैद्राबाद रोडच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.
मिळालेले बातमीचे आशयाप्रमाणे गाडीचा शोध घेत असताना संशयीत हॉल्सवेगन गाडी बोरामणी गावाच्या शिवारामध्ये दिसली. तिचा पाठलाग करित असताना सदर गाडीतील लोक संशय आलेने गाडीसह सोलापूरचे दिशेने पळू लागलेने सदर गाडीचा सिनेस्टाईलरीत्या बोरामणी येथुन पाठलाग करीत मुळेगाव तांडा येथपर्यत आले असता गाडीतील संशयीत इसमांनी सदर वाहन पुन्हा हैद्राबादच्या दिशेने वळवून घेवून जावू लागले म्हणुन नमुद वाहन मुळेगाव तांडा परिसरात हैद्राबाद सोलापूर रोडवर पाठलाग करुन सरकारी वाहने आडवे लावून थांबवण्यात आले.
सदर गाडीची पाहणी करता सदर गाडीचा क्र. यूपी १६ एएच ८३४९ असा होता. सदर गाडीची तपासणी करता गाडीतून तीन संशयित आरोपी मिळुन आले. त्यांचेकडे त्यांनी एलिफंट गेट पोलीस स्टेशन चैन्नई तामिळनाडु येथे गु.र.नं. ९१६/२०२० भा.द.वी.कलम ३०२, ३४ आर्म ॲक्ट ३, २७ प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये वापरलेले एक रिव्हॉल्वर व तिन जिवंत काडतुस मिळुन आले. गुन्हयातील सदर वाहन, रिव्हॉल्हर व तीन जिवंत काडतुस गुन्हयाच्या कामी N २ काशीमेडु पोलीस स्टेशन, जि.चेन्नई येथील पोलीस निरीक्षक श्री. पी. जवाहर यांनी जप्त करुन आरोपींना ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अरूण सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीण, सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, पोहेकॉ/ संजय देवकर, पो.ना. प्रकाश क्षिरसागर, पोना / अनिस शेख, पोना/ राहुल कोरे, पोको/ शशि कोळेकर, चापोकॉ/ बसवराज अष्टगी, चापोकॉ/ कदम, पोकॉ/ मोहन मोटे, नेमणूक सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, पोहेकॉ/ सचिन वाकडे, पोहेकॉ/ श्रीकांत गायकवाड, पोना/ परशुराम शिंदे, पोना/ लालसिंग राठोड, पोकॉ रामनाथ बोंबीलवार नेमणूक स्था.गुन्हे शाखा, पोका/ अन्वर अत्तार ने. सायबर पोलीस येथील यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.