कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
सोलापूर जिल्ह्यात प्रार्थना फाऊंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, वंचित, निराधार, भीक्षा मारणाऱ्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी प्रार्थना बालग्राम आदिवासी प्रकल्प चालवला जात आहे. अनाथ ,निराधार, बेघर असलेल्या वृद्धांसाठी वृद्धाश्रम चालवले जाते.
प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम उभारणीसाठी मदतीचा ओघ सुरूच, अरुण जोशी यांच्याकडून एक लाख रुपयांची मदत
प्रार्थना फाउंडेशनचे कार्य हे समाजासाठी खूप मोलाचे आहे अशा समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या पाठीमागे उभे राहणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असून समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी या कामी मदतीचा हात पुढे करावा.- अरुण जोशी
सध्या हा प्रकल्प भाड्याच्या जागेत सुरू आहे. संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे जागा घेऊन या ठिकाणी प्रार्थना बाल ग्राम व वृद्धाश्रम उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था या प्रकल्प उभारणीसाठी पुढे येत आहेत.
या निवासी प्रकल्प उभारणीसाठी आय. एम. एस स्कूलचे अरुण जोशी यांनी एक लाख रुपये दिले आहेत. या प्रकल्प उभारणीसाठी अनेक दानशूर व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.
‘कुतूहल’ च्या पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount