कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे
शासनाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी; राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांची मागणी
पंढरपूर : सध्या डाळिंब पिकावर तेल्या आणि कुजवाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. यामुळे या डाळिंब फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तसेच मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता डाळिंब पिकाच्या नुकसानीचे एक नवीन संकट ओढवले आहे.या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना, शासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देवून शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे पंढरपुर तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.