कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी व बार्शी तालुक्यातील नारी हा पाच किलोमीटर लांबीचा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे त्यामुळे नागरिकांना चिखलातूनच वाट शोधत प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता चिखलमय झाल्याने या मार्गा वरून ये जा करणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
कारी-नारी रस्ता चिखलात; चिखलात शोधावी लागतेय वाट
पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्यात पाणी साचत असल्याने दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रिमझिम पाऊस झाला तरी चिखल तयार होतो. त्यामुळे शेतकऱ्यासह, सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावरून ये जा करणे कठीण होते. मात्र दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना सकाळ संध्याकाळ दूध घेऊन गावात जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने शेतात काढणीस आलेल्या शेतमालाची मळणी करण्यासाठी मशीन देखील येऊ शकत नाही. त्यामुळे शेतमाल शेतात भिजतो असे येथील शेतकऱ्यांने सांगितले. अवघ्या पाच किलोमीटरवर असलेल्या नारी या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने वाहनधारकांना अंबेजळगे, कौडगाव या दूरवरच्या रस्त्याने प्रवास करावा लागतो. पक्का रस्ता नसल्याने वाहनधारक, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा रस्ता होणे आवश्यक आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही दुग्ध व्यवसाय करतो. परंतु आम्हाला ये जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे दररोज चिखलात वाट तुडवत जावे लागते.-सुजित चौधरी, कारी.
पक्का रस्ता नसल्याने पिकांची मळणी करण्यासाठी मशीन शेतात आणता येत नाही. त्यामुळे जास्तीचा पाऊस झाल्यानंतर पिक वाया जाते. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.-अनिल चौधरी, कारी.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount