कुतूहल न्यूज नेटवर्क
लेखक:- अशोक माळी, सामाजिक कार्यकर्ते
महाराष्ट्र राज्य हे एक ऐतिहासीक वारसा लाभलेले राज्य म्हणून जगामध्ये ओळख आहे परंतु खरच या ऐतिहासिक वारसा आपण जपलेत का याचा कुठे तरी अभ्यास करण्याची गरज सध्या आहे. धाराशिव लेणी ची दुरवस्था सध्या पर्यटक कमी होण्याला कारणीभूत ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूचा वारसा जपल्यास विकास व पर्यटन वाढिसाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. परंतु लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने या कडे जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या ऐतिहासिक वास्तू जर नाहीश्या झाल्यातर येणाऱ्या पिढीला महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक राज्य होते म्हणून सांगावे लागेल अशी सध्या किल्ल्याची व लेण्यांची दुरवस्था झाली आहे.
ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज
या वास्तूवर प्रेमीयुग्लानी भिंती खराब केल्या आहेत व मध्यापिणी येथे दारूच्या बाटल्या देखील टाकल्या आहेत. संरक्षक कठडे देखील नाहीत त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी लावकरात लवकर ह्या लेण्यांची देखभाल दुरुस्ती व्हावी अशी मागणी पर्यटकामधून होऊ लागली आहे. धाराशिव लेण्या पाहण्यासाठी मी प्रथमच आलो होतो परंतु या ठिकाणी आल्यानंतर लेण्यांची झालेली दुरवस्था पाहून खूप वाईट वाटले. सरकारने राज्यातील लेण्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी व ऐतिहासिक वस्तूचे संवर्धन करावे.