कुतूहल न्यूज नेटवर्क
इ.१२ वी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर ; असा पाहा निकाल
पुणे : मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेेण्यात आलेल्या (HSC) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ . १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
३. www.maharashtraeducation.com
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट ) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.