कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : आज दि. २९ ऑगष्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन वेबसेरीज अली आहे जिचं नाव आहे “ती आणि मी”. कॉन्फिडन्स फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत कॉलेज जीवनावर आधारित असणारी ही वेबसेरीज शिक्षण, प्रेम आणि मैत्री या मुद्यावर आधारित आहे. ही वेबसेरीज पाहिल्यावर प्रत्येकाला आपलं कॉलेज, पहिलं प्रेम आणि कॉलेजच्या मित्रांची गॅंग या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे. या आधी याच प्रोडक्शन अंतर्गत “सुमडीत कुमडी” ही वेबसेरीज प्रदर्शित करण्यात आली होती. अत्यंत कठीण परिस्थितीमधून बार्शी व इतर जिल्ह्यातील काही कलाकारांनी ही वेबसेरीज बनवली आहे.
‘ती आणि मी’ वेबसेरीज आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला
या वेबसेरीज मध्ये मुख्य पात्र विजय आणि श्रेया हे आहेत. ते अगदी योग्य पद्धतीने अक्षय शिंदे आणि प्रतिभा लठ्ठे यांनी साकारले आहे. त्याच प्रमाणे महेश कोरे आणि निशा शेळके यांनी आपल्या अभिनयातून मैत्रीच्या पदव्या मिळवल्या आहेत. यातील प्रमुख खलनायकाची भूमिका श्रावण बोराडे यांनी साकारली आहे. या वेबसेरीजचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते रोहित देशमुख हे आहेत. त्याचप्रमाणे कॅमेरा संदर्भातील मोलाची मदत कैलास गव्हाणे यांनी केली आहे. तसेच याचे संकलन श्रावण बोराडे यांनी तर संगीत जॅक फिल्म स्टुडिओ यांनी केले आहे. यशोधन सोमण यांनी निर्मिती साहाय्य केले असून पृथ्वीराज सावंत, कृष्णा बरबोले, नागेश अण्णा अक्कलकोट यांनी शुटिंग साठी स्थळ, परवाने या बाबत मदत केली आहे.
त्याचप्रमाणे मयूर काळे, शिवम निकम, शुभम देवकर, कुमार अस्वदे, कार्तिकी परदेशी, भक्ती कुलकर्णी, बुधभूषण आठवले, योगेश उपळकर, अबोली पालखे, ब्रम्हदेव मोरे, वेदांगी खुणे, जीवन लोखंडे, प्रीती सुतार, कविता वर्डे, सुनील लिंगायत, अनंत खुणे, महादेव जाधवर, अतिष पालखे, महादेवराव देशमुख, अभिषेख दुधाळ, इत्यादी कलाकार आपणाला या वेबसेरीज मध्ये दिसतील. ही वेबसेरीज प्रेक्षकांना कॉन्फिडन्स फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनेल वर पाहायला भेटेल.
पहिला भाग
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount