fbpx

मळेगावचा गावतलाव सौरऊर्जा वरील पथदिव्याने उजळणार

कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी

कारी :बार्शी तालुक्यातील मळेगाव या गावाने राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.त्यामुळे ग्रामपंचायतला राज्य शासन कडून अनेक जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे गाव गेल्या 45 वर्षांपासून ग्रामपंचायत बिनविरोध करीत आहे,त्यामुळे गावामध्ये विविध विकासकामे होत आहेत आहे,श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी,यांच्या मार्गदर्शनाखाली मळेगावचे सरपंच गुणवंत मुंढे,यांच्या प्रयत्नातून व गावचे ग्रामसेवक शिवाजीराव गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांच्या सहकार्यातून गावामध्ये विविध विकासकामे झाली,त्यांचं पार्श्वभूमीवर गावामधील गावतलाववर सौरऊर्जावरील दिवे बसवण्यात आले आहेत,त्यामुळे पथदिव्याने गावतलाव उजळणार आहे,या सौरऊर्जा दिव्यासाठी गावामध्ये ऊर्जाप्लँन्ट बसवण्यात येणार आहे,व गावतलाववर जेष्ठ नागरिक,व युवकांसाठी मॉर्निंग ट्रॅक उभारण्यात आला आहे,या ट्रॅक वर झाडे शोभेची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे,यामुळे गावच्या विकासामध्ये आणखी भर पडणार आहे,

कुतूहल न्यूज मध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात आणि पोहचा लाखो ग्राहकांपर्यंत. तसेच द्या आपल्या खास व्यक्तींना वाढदिवसाच्या व इतर शुभेच्छा.तेही फक्त 200 रुपयांत* संपर्क : 7020502856

मळेगाव हे एक विकसनशील गाव आहे, गावातील नागरिक गावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करतात म्हणून या गावाची आदर्श गाव म्हणून ओळख आहे,सौरऊर्जा दिव्यामुळे गावच्या विकासात आणखी भर पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *